
पाटील यांचा विश्वास महायुतीचे उमेदवारच पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक जिंकणार
बातमी थोडक्यात
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे दोघेही विजयी होणार असल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. पाटील यांनी शुक्रवारी पेठणाका येथील मतदान केंद्राला भेट दिली. त्यावेळी भाजप नेते आणि बँक अधिकारी उपस्थित होते. पेठ येथील मतदान केंद्रावर मतदानापूर्वी त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.