
तुळजापूर : कोजागरी पौर्णिमा उत्सवासाठी भाविकांची गर्दी
बातमी थोडक्यात
कोजागरी पौर्णिमा उत्सवासाठी तुळजापूर येथे पुढील दोन दिवसात किमान दहा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सोलापूर येथून भाविक अनवाणी येत असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही याची प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. सोमवार सकाळी श्री तुळजा भवानी मातेची मुख्य मूर्ती स्थापित करून पंचामृत पाजून दोन वेळा स्नान करून भाविकांना दररोजची पूजा संपेपर्यंत मातेचे दर्शन घडविले जाणार आहे.