
अमरावती शिक्षक मतदार संघात ९२.२५ टक्के मतदान
बातमी थोडक्यात
अमरावती शिक्षक मतदार संघात सर्व मतपेट्या मिळाल्यानंतर मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. यात ९२.२५ टक्के मतदान झाले. अमरावतीमध्ये सर्वात कमी ८९.३६ टक्के मतदान झाले, तर वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ९५.१३ टक्के मतदान झाले. २७ ऑक्टोबर रोजी लोकशाही भवनात मतमोजणी होणार आहे.