
पंकज गुड्डेवार यांची गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
बातमी थोडक्यात
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी अॅड. विश्वजित कोवसे यांच्या कारावासा नंतर गडचिरोली काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून पंकज गुड्डेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली. विद्यार्थी जीवनापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या गुड्डेवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांना आहे.