
जालना : ७.४४ लाख मुलांना मिळणार जंतनाशक गोळ्या
बातमी थोडक्यात
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील ७ लाख ४४ हजार ४२६ मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेत ४ लाख ३२ हजार ७३८ ग्रामीण व २ लाख ३७ हजार ३९ शहरी मुलांचा समावेश असून ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप डे आयोजित करण्यात आला आहे. १ ते १९ वयोगटातील मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी व अशक्तपणा आणि कुपोषणाचा धोका कमी करण्यासाठी त्यांना गोळ्या देण्याचे काम पालकांनी करावे.