
जयपूरमध्ये भाविकांच्या वाहनांची टक्कर, चौघांचा मृत्यू
बातमी थोडक्यात
राजस्थानच्या जयपूरमध्ये भाविकांच्या वाहनांची टक्कर होऊन चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. नाशिकचे पालकमंत्री व राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने मदतकार्याला सुरुवात केली असून शवविच्छेदन आणि मृतदेह ताब्यात घेण्यासाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी संपर्क साधला आहे. जखमी भाविकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली आहे.