
विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ७ महिन्यांत ११ निलंबित
बातमी थोडक्यात
गुन्हेगारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, निष्काळजीपणा आणि गोपनीयतेचे उल्लंघन या कारणांमुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सात महिन्यांत ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले. आयुक्तांनी थेट केलेल्या कठोर कारवाईमुळे अधिकारी व कर्मचारी हादरले आहेत. शिक्षक महिलेची छेड काढल्याबद्दल रजिस्ट्रार दिलीप अडे यांना निलंबनाची शिक्षा भोगावी लागणार आहे.