
पिठोरी सिरसगावमध्ये ऊस पेटला शॉर्ट सर्किटमुळे
बातमी थोडक्यात
अंबाड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे महावितरणच्या वायरला घर्षण झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन अडीच एकर ऊस पेटला. त्यामुळे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी आग पसरल्यानंतर आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. आग वाढण्यापूर्वीच ऊस काढल्याने घटना टळली.