
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा विजय निश्चित
बातमी थोडक्यात
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केला असून २७ तारखेला निकाल लागल्यावर 'आत कोण आहे' हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. ४१ उमेदवार असलेल्या मोठ्या मतपत्रिकेचे प्रात्यक्षिक न दाखविल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. मतदान कमी होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.