
महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक जागेसाठी आज मतदान
बातमी थोडक्यात
महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांसाठी आज मतदान होत असून, 2 हजार 419 मतदान केंद्रांवर 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पदवीधर मतदारसंघात सुधाकर कोहळे, अभिजीत वंजारी यांच्यासह 38 उमेदवार उभे आहेत. सायंकाळी चार वाजता मतदान संपेल.