
जेजुरी : १५ दिवसात सहा आत्महत्या
बातमी थोडक्यात
जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये गेल्या १५ दिवसात सहा जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मांडकी येथील विशाल सणस, बेळसर येथील योगिता जगताप यांच्यासह घडलेल्या घटनांमुळे नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. जावळझारूण येथील महेश कदम याच्या ताज्या आत्महत्येने स्थानिक लोकांची चिंता वाढली आहे.