
देशांतर्गत ७७ टक्के सुवर्णसाठा आरबीआयकडे
बातमी थोडक्यात
देशांतर्गत ६८०.०५ टन सुवर्णसाठा असून त्याची किंमत ११.१० लाख कोटी रुपये आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले. एकूण ८८०.५२ टन सुवर्णसाठ्यापैकी ७७ टक्के सुवर्णसाठा देशांतर्गत असून उर्वरित सुवर्णसाठा परदेशात आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारणा केल्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती जाहीर केली.