
पुणे मतमोजणी अचूकतेसाठी प्रशिक्षण
बातमी थोडक्यात
शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी अचूक मतमोजणीबाबत विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अल्पबचत भवनात सहआयुक्त संजय पाळंदे व अतिरिक्त जिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण घेण्यात आले. मतमोजणीसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण २६ ऑक्टोबर रोजी बालेवाडी येथे होणार आहे.