
उरण पाणी कपात २७ ऑक्टोबर पासून सुरु
बातमी थोडक्यात
एल निनो मुळे राणसई धरणाचे पाणी रोज एक इंच खाली जात असल्याने उरण शहर व ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. या संकटामुळे २० ग्रामपंचायती व औद्योगिक क्षेत्रांना धोका निर्माण झाला असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे. २७ ऑक्टोबर पासून पाणी कपात सुरु होणार आहे.