
सायन-धारावी उड्डाणपूल आज खुला
बातमी थोडक्यात
सायन-धारावी उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी खुला होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वेळेआधीच या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येत आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळील या उड्डाणपुलामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होऊन संपर्क व्यवस्था सुधारणार आहे. उड्डाणपुलाच्या ठिकाणी या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.