
श्रीक्षेत्र तुळजापूर येथे माता तुळजाभवानीच्या सिमोलंघनासाठी ६० हजार भाविक उपस्थित
बातमी थोडक्यात
श्रीक्षेत्र तुळजापूर येथे २१ ऑक्टोबर रोजी माता तुळजाभवानी मातेचा सिमोलंघन सोहळा पार पडला. मध्यरात्रीपासून सकाळी ६ वाजेपर्यंत ६ तास मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ६० हजार भाविकांनी 'आई राजा उडो-उडो' अशा घोषणा दिल्या. देवीच्या मूर्तीसाठी १०८ सुती साड्यांचे संरक्षक कवच तयार करण्यात आले. मूर्ती पालखीत बसवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून मंचकी निद्रा झाली. देवी पाच दिवस सुप्त अवस्थेत राहील.