
पुणे पदवीधर मतदार संघात डॉ. स्मिता जाधव यांनाच शिवसेना मतदान करणार
बातमी थोडक्यात
एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रिय सहभागामुळे पुणे पदवीधर मतदार संघात डॉ. स्मिता जाधव यांनाच मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. डॉ. जाधव यांच्या विजयासाठी सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहणार आहेत. डॉ. जाधव यांनाच मतदान करा, असा संदेश जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांपर्यंत तीन ते चार दिवसात पोहोचवला जाईल.