
अवैध ओबीसी प्रमाणपत्रावरून भिवंडी नगरसेवकाचा दर्जा रद्द
बातमी थोडक्यात
फरजाना अन्सारी यांचे ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचा नगरसेवक पदाचा दर्जा रद्द करण्यात आला. 2022 मध्ये जारी करण्यात आलेले हे प्रमाणपत्र तक्रारीनंतर समितीने अवैध ठरवले. प्रभाग क्र. 4-अ मधील ही जागा आता रिक्त झाली असून भिवंडीच्या राजकीय गणिताला कलाटणी मिळाली आहे. फरजाना दिलासा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत.