
१५ ते १८ हजार एनएचएम कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्त करण्याचे राज्य
बातमी थोडक्यात
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १५ ते १८ हजार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरण करण्यात येणार आहे. मुंबईत राज्यस्तरीय कार्यक्रमात नियुक्तीपत्र वितरण करण्यात येणार असून त्यासाठी राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. कार्यक्रमासाठी ठिकाणे व सुविधा निश्चित करण्याची विनंती मुंबई महापालिकेला करण्यात आली आहे.