
कराड जवळ पुणे बंगळूरु महामार्गावर ट्रकच्या धडकेत चार मित्रांचा मृत्यू
बातमी थोडक्यात
कराड जवळच्या नवीन सहा पदरी उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत चार मित्रांचा मृत्यू झाला. हे चौघे महालक्ष्मी कोल्हापूरला दसरा दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होते. या अपघातात आणखी तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.