
शिवसेनेच्या नेत्यांचा दावा एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार
बातमी थोडक्यात
गोरेगाव येथील दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे हेच पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला. शिंदे हे राम सेतू असल्याचं सांगून शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी तुळजा भवानी देवीचा आशीर्वाद मागितला. शिंदे यांना विरोध करणं चांगलं नाही. राज्यात दुष्काळ ही प्राथमिकता असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.