
साईनाम उत्सवानिमित्त रात्रभर दर्शनासाठी उघडले समाधी मंदिर
बातमी थोडक्यात
श्री साईबाबांच्या १०८ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दोन लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली, या निमित्ताने रात्रभर समाधी मंदिर उघडण्यात आले. उत्सवानिमित्त सुमारे ८५ हजार भाविकांनी प्रसाद ग्रहण केला, तर ७० हजार भाविकांनी संस्थानच्या प्रसादालायनातून भोजन घेतले. साईनामाच्या अखंड गर्जनेने मंदिर परिसर आणि शिर्डी दणाणून गेले.