
नाशिक कुंभमेळ्यासाठी पार्किंगसाठी १ हेक्टर जमीन अधिग्रहित
बातमी थोडक्यात
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ मध्ये ध्वजारोहणाच्या वेळी पार्किंगसाठी शिंदे मल्ल येथे १ हेक्टर १३ आर जमीन अधिग्रहित करण्यात येत आहे. ही जमीन १५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पार्किंगसाठी तसेच ३१ ऑक्टोबर २०२७ पर्यंत अंतर्गत पार्किंग लॉट, होल्डिंग क्षेत्र आणि स्टेजिंग क्षेत्र म्हणून वापरली जाईल. गोदावरी स्नांगहाट परिसरात गर्दी वाढल्यास भाविकांसाठी सुरक्षित पार्किंगची सोय व्हावी, यासाठी ही जमीन अधिग्रहित करण्यात येत आहे.