
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये २३ ऑक्टोबर रोजी मतदान
बातमी थोडक्यात
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून पाच जागांसाठी १८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत २ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १० लाख ६८ हजार ७२ मतदार मतदानासाठी सज्ज आहेत. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत असल्याने नवीन सदस्यांची निवड होणे आवश्यक आहे. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल.