
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बैठकीत विरोधकांकडून निधी वाटपाला आव्हान
बातमी थोडक्यात
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विकास निधीवरून सत्ता पक्ष विरुद्ध विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ता पक्षाच्या भूमिकेचा निषेध करत सभा सोडली. राजन चिके यांनी प्रकल्पांना वगळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'आम्ही पाकिस्तानमधून आलो का?' असा सवाल केला.