
मेट्रोच्या कामामुळे मार्केट यार्ड चौकात वाहतूक बदल
बातमी थोडक्यात
मेट्रोच्या भूमिगत कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्केट यार्ड चौकात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. काही मार्गांवरून वाहनचालकांना जाण्यास मनाई करण्यात आली असून त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हे बदल लागू राहतील.