
वाशिम दुष्काळामुळे संत्र्याची फळे पिकण्याआधीच काढली जात आहेत.
बातमी थोडक्यात
वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी दुष्काळामुळे संत्रा पिकण्याआधीच ७० ते ७५ टक्के फळे काढत आहेत. पाणी वाचवण्यासाठी झाडांवरील फळे काढण्याची वेळ आल्याने आर्थिक स्थिती खालावली आहे. संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वाणोजा भागात विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी घटल्याने उत्पादन कमी झाले आहे.