
पोलीस मुख्यालयाने जिंकला क्रीडा किताब
बातमी थोडक्यात
जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये अकोला पोलीस मुख्यालयाच्या पथकाने तीन दिवस वर्चस्व गाजवत सर्वसाधारण किताब पटकावला. रोहन गवांडे याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला 'उत्कृष्ट खेळाडू' म्हणून गौरवण्यात आले. समारोप सोहळ्याला अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी उपस्थित होते.