
कर्जमाफी हुकल्याने बोरगाव तेलंग येथे शेतकऱ्याची आत्महत्या
बातमी थोडक्यात
बोरगाव तेलंग येथील ४६ वर्षीय शेतकरी शंकर क्षीरसागर यांचे कर्जमाफीच्या तीन याद्यांमधून नाव वगळल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मुलीचे शिक्षणही माफ झाले नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी.