
गुंदेवाडीच्या शेतात तरुणाची चाकूने भोसकून हत्या
बातमी थोडक्यात
गुंदेवाडी येथील शेतात झालेल्या झटापटीत सुनील तानाजी खांडेकर यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या पोटात गंभीर रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर चाकू पोटावर खुपसून घटनास्थळावरून पळून गेले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.