
गुंडेवाडीत चाकूने वार करून तरुणाची हत्या
बातमी थोडक्यात
मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे शेतात काम करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी सुनील तानाजी खांडेकर (वय ३०) याच्या पोटावर वार केले. या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली असून सुनीलचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला, तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मिरज ग्रामीण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.