
दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार
बातमी थोडक्यात
दक्षिण भारतात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये २४ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात १९ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.