
नवरात्र काळात आंबाबाई मंदिराला भाविकांची गर्दी
बातमी थोडक्यात
शरद नवरात्र काळात रविवारी करवीर निवासिनी श्री आंबाबाई मंदिरात सव्वा लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी ११ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा मुख्य दर्शन मंडपात भरल्या होत्या. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. त्यामुळे भाविकांच्या गर्दीने धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम झाला. दिवसभर मंदिराच्या आवारात भाविकांची गर्दी होती.