
काँग्रेसच्या मतासाठी अमरावतीतील शिक्षकांना बडतर्फीची धमकी
बातमी थोडक्यात
शिक्षक मतदार संघ निवडणुकीत काँग्रेसला मतदान न केल्यास अमरावती विभागात शिक्षकांना बडतर्फीची धमकी देण्यात येत आहे. शिक्षकांना धमकावून मतं मिळवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. शिक्षकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. तक्रारींची चौकशी केली जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.