
बारामतीमध्ये पुण्यातील उद्योजकावर हल्ला
बातमी थोडक्यात
बारामतीतील काटफळ परिसरात विमानतळावर पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने आलेल्या हल्लेखोरांनी पुण्यातील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर चाकूने वार केले. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बारामती तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत. या हल्ल्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.