
पोस्टल कर्मचाऱ्यांना 60 दिवसांचा बोनस
बातमी थोडक्यात
पोस्टल कर्मचाऱ्यांना 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 60 दिवसांच्या पगाराच्या बरोबरीचा दिवाळी बोनस मिळणार आहे. प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस योजनेअंतर्गत मिळणारा हा बोनस गट 'क', अराजपत्रित गट 'ब' आणि एमटीएस कर्मचाऱ्यांना मिळणार असून, त्याची कमाल रक्कम 13 हजार 816 रुपये असेल. ग्रामीण डाकसेवक आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत निवृत्त किंवा बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या कालावधीनुसार बोनस मिळणार आहे.