
महाराष्ट्रात पावसाचा इशारा: IMD कडून दहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
बातमी थोडक्यात
ऑक्टोबरच्या उष्णतेचा तडाखा महाराष्ट्रात बसल्याने कोल्हापूर, चिपळूण, धुळे, सांगलीसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक भागातील नागरिकांना पावसाने गारवा दिला आहे. उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.