
मेट्रो कामामुळे कात्रज चौकात अवजड वाहनांवर बंदी
बातमी थोडक्यात
स्वारगेट ते कात्रज दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक पोलिसांनी कात्रज चौकातून जाणाऱ्या जड वाहनांवर बंदी घातली आहे. नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने पर्यायी मार्ग सुचवले आहेत. उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकर यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बदल केल्याची माहिती दिली.