
रोटरी क्लबकडून न्यूपूर शाळेला सायकली आणि हात धुण्याचे स्टेशन
बातमी थोडक्यात
रोटरी क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्व कडून न्यूपूर शाळेला पाच सायकली आणि हात धुण्याचे स्टेशन भेट देऊन शाळेच्या भौतिक सुविधा वाढवल्या. हात धुण्याचे स्टेशनमुळे हात स्वच्छ ठेवण्याची सवय लागावी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी. पाच सायकली लॉटरी पद्धतीने विद्यार्थिनींना देण्यात आल्या.