
कोल्हापूर शहरात दुष्काळात 10 टक्के पाणी कपात
बातमी थोडक्यात
कोल्हापूर शहरात दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शनिवार, 17 ऑक्टोबरपासून 10 टक्के पाणी कपात लागू केली आहे. शहराचा पाणीपुरवठा दररोज 150 एमएलडी पर्यंत खाली येणार असून 12 विहिरी आणि 550 बोरवेल दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिवाळी पर्यंत ही कपात कायम राहणार आहे.