
अडगांव रोडवर हायड्राच्या धडकेत तीन मजुरांचा बळी
बातमी थोडक्यात
अडगांव रोडवर कामावरून घरी परतत असताना भरधाव वेगाने आलेल्या हायड्राने धडक दिल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती बेतूल जिल्ह्यातील बक्का चिकणी येथील रहिवासी होते. इतर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.