
दिवाळीच्या तोंडावर परभणीत एफडीएकडून 63 लाख रुपयांचा बनावट फरसाण जप्त
बातमी थोडक्यात
परभणीतील मोती नमकीन कारखान्यावर एफडीएची धाड, 63 लाख 14 हजार रुपयांचा संशयित फरसाण जप्त. अस्वच्छता, दर्जेदार नोंदींचा अभाव यासह गंभीर त्रुटी आढळल्या. नमुन्यांची तपासणी सुरू असून कारखान्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. धाराशिवमध्येही 16 लाख 7 हजार रुपयांचा अवैध गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला.