
नवोदय विद्यालयात प्रवेशासाठीची अंतिम मुदत २२ ऑक्टोबर पर्यंत वाढवली
बातमी थोडक्यात
नवोदय विद्यालयाने नववी आणि अकरावीच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. प्राचार्य श्री. पी. ओ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना या मुदतवाढीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. २३ ते २५ ऑक्टोबर या काळात कॅटेगरी आणि अपंगत्व यासारख्या तपशीलांमध्ये सुधारणा करता येणार आहे.