
महाराष्ट्रात शालेय प्रवेशाचे वय सहा वर्षे निश्चित
बातमी थोडक्यात
महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय प्रवेशाचे किमान वय निश्चित केले असून, इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांचे वय सहा वर्षे असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये पूर्व-प्राथमिक आणि पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी नवीन वयाचे निकष लागू होतील. याची अंमलबजावणी २०२७-२८ पासून सुरू होईल. नवीन निकषांमुळे २०२६-२७ मधील नर्सरी ते पहिलीच्या विद्यमान विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.