
जाधववाडीत बिबट्या पकडला
बातमी थोडक्यात
शेतकऱ्यांशी वारंवार झालेल्या चकमकीनंतर आंबेगाव तालुक्यातील जाधववाडीत वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या सापडला. गार ओढा, सुंदरमाला परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे भीती कायम आहे. पकडलेला बिबट्या दीड ते दोन वर्षांचा आहे.