
मेट्रोच्या कामामुळे कात्रज चौकात जड वाहनांना बंदी
बातमी थोडक्यात
स्वारगेट ते कात्रज दरम्यान सुरू असलेल्या भूमिगत मेट्रोच्या कामामुळे कात्रज चौकात अनेक मार्गांनी जड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी नवले पूल, कात्रजचा नवीन बोगदा या मार्गांचा वापर करावा. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी बदल करण्याची मागणी डॉ. संदीप भाजीभाकर यांनी केली.