
नाशिक पुणे महामार्गावरील एमएसईबी इमारतीला आगीचे नुकसान
बातमी थोडक्यात
नाशिक पुणे महामार्गावरील एमएसईबी इमारतीला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली असून कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला संपर्क साधला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून कोणतीही जीवितहानी न होता आग विझवण्यात आली.