
छत्रपती संभाजीनगर: १९ अनधिकृत पाणी जोडण्या तोडल्या
बातमी थोडक्यात
अनधिकृत पाणी उपसा केल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुख्य पाणीवाहिनीवरील १९ अनधिकृत जोडण्या तोडल्या. अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांना या कारवाईमुळे धक्का बसला असून शहरात शोध मोहीम अधिक तीव्र करण्याची योजना आहे. हरसाळ तलावातून होणारी पाणी चोरी आणि अनधिकृत उपसा खपवून घेतला जाणार नाही.