
कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे मुंबईतील हॉटेल्स वाढवणार
बातमी थोडक्यात
भाज्या, तांदूळ, गहू, डाळी, खाद्यतेल, मसाले यांच्या वाढत्या किमतींमुळे मुंबईतील हॉटेलच्या दरात वाढ होणार आहे. रोज बाहेर जेवण करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी, मजूर आणि कुटुंबांना या दरवाढीचा फटका बसणार असून इडली, डोसा, लंच थाळी यांसारख्या पदार्थांच्या दरात १० ते २० रुपयांची वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील दुष्काळामुळे पुरवठ्याच्या समस्या वाढल्या असून हॉटेल मालकांचा खर्च वाढला आहे.