
निवडक युजर्ससाठी जिओची फ्री रिचार्ज ऑफर
बातमी थोडक्यात
जिओ निवडक ग्राहकांना 'एक खरेदी करा एक मिळवा' रिचार्ज ऑफर देत आहे. जिओच्या २९९ किंवा ३४९ रुपयांच्या रिचार्जवर एक महिना फ्री सेवा मिळणार आहे. ज्यांना जिओकडून या ऑफरबद्दल मेसेज आला आहे, त्यांनाच ही ऑफर मिळणार आहे. युजर्सनी 'माय जिओ' ॲपद्वारे रिचार्ज केल्यासच फ्री प्लॅन सुरु होईल. युजरने एक्सवर याबद्दल माहिती दिल्यानंतर जिओने ही ऑफर उघड केली. निवडक ग्राहकांसाठी ही ऑफर आहे, असे जिओने स्पष्ट केले आहे.